क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले.

क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले. त्यातलाच एक सहवीज निर्मिती प्रकल्प. दहा वर्षापूर्वी राज्यात विजेचा तुटवडा असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फटका शेती उत्पादनात बसू नये म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हा २० मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला गेला होता. या प्रकल्पाचा यंदाच्या हंगामातील आज शेवटचा दिवस होता. याच सहवीज निर्मिती प्रकल्पात काम करणारे आमचे एक निष्ठावान कर्मचारी कुमार मधुकर कदम यांच्या हस्ते या समारंभाचा समारोप केला.
आज सहकार क्षेत्रात क्रांती कारखाना मोठ्या थाटात उभा असण्याचं कारण म्हणजे या कारखान्याचे सर्व कर्मचारी, पदाधिकाऱ्यापासून ते हेल्परपर्यंत काम करणाऱ्या लोकांची निष्ठा व कार्यतत्परता आहे. तसेच या क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यामुळे क्रांती कारखाना देशात आघाडीवर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.
जी. डी. बापूंच्या स्वप्नातील शेतकरी वर्ग व कामगार वर्ग आज समाधानकारक असल्याचा अभिमान वाटत राहतो. इथून पुढेही सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी कामगार व मजूर वर्गासाठी काम करत राहू असं या दिवसाच्या निमित्ताने मी आश्वासन देतो.‌

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top