रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, बुर्ली याठिकाणी स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र मा.अरुण लाड यांच्या उपस्थितीत पार पडले.

रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, बुर्ली याठिकाणी स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली.

प्रतिक्रांती चळवळीचे फिल्ड मार्शल ते आधुनिक काळातील सहकार क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे, विकासाला वाहून घेणारे शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढवय्या नेते असे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचे जीवनचरित्र सर्वांनाच भुरळ घालते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान आणि त्यानंतर बदलत्या काळाशी जुळवून घेत सहकार क्षेत्रात दिलेले त्यांचे योगदान अद्वितीय असेच आहे. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, बुर्ली येथे आयोजित चर्चेप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी बापूंच्या क्रांतिकारी कार्यास उजाळा दिला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top