ऑनलाईन परीक्षा पद्धतीने जेवढा परीक्षा शुल्क होतो तेवढाच परीक्षा शुल्क आकारावा ! – मा.आमदार अरुण लाड यांचे कोल्हापूर विद्यापीठाला निवेदन

आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली जिल्हा, इंजीनियरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड जिल्हा या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. भेटीदरम्यान चर्चेत कोल्हापूर विद्यापीठांच्या ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या परीक्षेचे शुल्क हे ऑफलाईन पद्धतीचे आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.

सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेबरोबर विद्यार्थ्यांना सुध्दा झळ पोहोचली आहे. या लॉकडाऊनमधे सर्व विद्यापीठांच्या ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होत आहेत मात्र त्यासाठी परिक्षा शुल्क ऑफलाईन पद्धतीचे आकारले जात असल्याने गोरगरीब , काम करून शिकणाऱ्या विद्यार्थी वर्गाला आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. तसेच सध्या महाविद्यालये बंद असताना महाविद्यालयीन सुविधेचा खर्च विद्यार्थ्यांना अजून आर्थिक अक्षम करत आहे. सन २०१७- १८ पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व शिष्यवृत्ती धारक असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात न आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

औरंगाबाद व सोलापूर विद्यापीठाने या संदर्भात जी भूमिका दाखवली आहे तीच भूमिका कोल्हापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंनी घेण्यासाठी त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधू. व या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच शासन स्तरांवर कोल्हापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे या मागण्यांचा पाठपुरावा करून विद्यार्थी वर्गाला दिलासा देऊ असे आवाहन उपस्थित विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top