स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज कुंडल याठिकाणी प्रभात फेरी काढण्यात आली, यावेळी उपस्थित राहून स्वतंत्र सैनिक विरपाक्ष लुपणे यांचा सत्कार केला. तसेच उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधला.
देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्ष पूर्ण होत असून अनेक वीरांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची जपणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने अनेक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली. अनेक चढउतार पहात आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत ही नक्कीच गौरवशाली घटना आहे. स्वातंत्र्यवीरांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करीत देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहूया.