कारखाना प्रगती पथावर ठेवण्यासाठी वेळोवेळी नवनव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते तंत्र आपल्या भागात राबवावे लागते. हाच अभ्यास करण्यासाठी आम्ही ब्राझीलचा दौरा केला होता. आज त्याला १३ वर्षे होत आहेत.
ब्राझीलची ऊस शेती आज जगात सर्वात प्रगत समजली जाते. कमीतकमी पाण्यात जास्तीतजास्त शेती कशी करावी ? उसापासून साखर सोडून अन्य कोणती उत्पादने घेता येतात जेणेकरून शेतकऱ्यांना आणखी लाभ होईल, अशा अनेक विषयांवर येथे चर्चासत्रे घडली. त्याचा लाभ आम्हाला आजही कारखान्याची यशस्वी वाटचाल करताना होत आहे.