सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सुवर्णमहोत्त्सवी राज्यस्तरीय महाअधिवेशन सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने आयोजित केले होते. सदर अधिवेशनास उपस्थित राहून आयोजकांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार केला.
स्वातंत्र्योत्तर काळात शेती हाच प्रमुख व्यवसाय रूढ झाला होता. मात्र शेतकऱ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे आवश्यक होते. शिक्षणाची व्याप्ती वाढल्याशिवाय हे शक्य नव्हते. नंतर मात्र शिक्षणाचा सरकारी यंत्रणांवर जास्तीचा भार पडू लागला परिणामी अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या. या शिक्षण संस्थांची व्याप्ती वाढणे, त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवले जाणे आवश्यक असल्याने महामंडळाच्या निर्मितीचा विषय पुढे आला. आज बगता-बगता या महामंडळाने अविश्वसनीय कामगिरी करीत सुवर्णमहोत्सवापर्यंत मजल मारली आहे. त्यांचे हे कार्य असेच अविरत सुरु यासाठी सदैव सदिच्छा आहेतच व पुढे ही राहतील.
या महामंडळाच्या अध्यक्षा मा. खासदार सुप्रियाताई सुळे या असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ अभूतपूर्व कामगिरी पार पाडेल यात तिळमात्र शंका नाही. या अधिवेशनास समवेत मा. आ. जयंतराव पाटील, ना. सुरेशभाऊ खाडे, आ. विश्वजीत कदम, मा. रावसाहेब पाटील, मा. विशाल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.