सर्वांच्या सहकार्याने सहकार उभा करणारा लोकनेता … अरुण अण्णा लाड

सर्वांच्या सहकार्याने सहकार उभा करणारा लोकनेता- अरुण अण्णा लाड

क्रांतिअग्रणी जी.डी बापू लाड यांनी जो पाणीपुरवठा योजनांचा आदर्श उभा केला. त्या योजनांचा आदर्श घेत अरुण अण्णा लाड यांनी सुद्धा पाणीपुरवठा योजनांचा गावोगावी धडाका लावला. याचा आदर्श घेऊन जिल्ह्यास्तरावरही पाणीपुरवठा संस्था फेडरेशन तयार करण्यात आली. त्या फेडरेशनचे अध्यक्षपद अरुण अण्णा लाड यांनाच देण्यात आले. या फेडरेशन चा आदर्श घेऊन राज्यस्तरावरही अशी फेडरेशन तयार करण्यात आली त्या फेडरेशनचे अरुण अण्णा लाड सदस्य आहेत. या योजनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ओलिताखाली १५,००० एकर जमिन आहे. व याच पाण्यामुळे विहिरींना होणाऱ्या पाझरामुळे अप्रत्यक्षपणे ३,००० एकर जमिन अप्रत्यक्षपणे ओलिताखाली आहे . या पाणी पुरवठा योजना सुरू होण्याआधी या भागातील शेतकरी पुर्णपणे पावसावर अवलंबून शेती करत होता. ८०% शेती जिरायती होती त्यामुळे नगदी पीक घेणे शक्य होत न्हवते. मात्र या योजना सुरू झाल्यावर या भागाचे रुपडेच पालटले. १९७६ नंतर या भागात ऊस, हळद , द्राक्षे यांसारखी नगदी पिके घेणे शेतकऱ्यांनी सुरू केली. सुशिक्षित तरुण शाश्वत पाण्यामुळे शेतीकडे आश्वासक दृष्टीने पाहू लागला व आधुनिक शेतीचा अवलंब करून शेतीतून भरघोस उत्पन्न घेऊ लागला. जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते ज्यांना पाणीपट्टी भरणे शक्य न्हवते अश्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी सर्व शेतकऱ्यांच्या सहभागातून भरण्याचा अनोखा उपक्रम याठिकाणी पहिल्यांदा सुरू झाला.ज्यावेळी जी.डी बापूंनी कारखान्याचा प्रस्ताव मंजूर करून आणला त्यावेळी सहकारी चळवळ जवळजवळ मोडकळीस आली होती.शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतीअग्रणी जी.डी बापू लाड सहकारी साखर कारखाना या नावाने एक आदर्श सहकारी साखर कारखाना बापूंच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी अनेक अडचणींवर मात करून उभा केला. पुढे अण्णांनी कारखान्यांमार्फत वेगवेगळे उपक्रम सुरू केले व जास्तीत जास्त तरुणांना प्राधान्य दिले .कंपोस्ट खत निर्मिती , माती प्रशिक्षण परीक्षण प्रयोगशाळा, बियाणे प्लॉट असे अनेक प्रकल्प कारखान्यामार्फत राबवले जातात. आज इतर राजकारणी संस्थाचं खाजगीकरणं करण्यात व्यस्थ असताना अण्णांनी सहकार एखाद्या दीपस्तंभासारखा टिकवून ठेवला आहे.त्याचबरोबर शेतीला पूरक उद्योग असावा म्हणून अण्णांनी क्रांती दुधसंघाची स्थापना केली. दुधावर प्रक्रिया करून त्यातून इतर पदार्थांची निर्मिती केली जावी त्यातून उद्योगाला चालना मिळावी हा त्यामागचा हेतू आहे.तसेच सहकारी तत्वांवर सहवीज प्रकल्प,आसवणी प्रकल्प अश्या प्रकारचे प्रकल्प ही चालवले जातात.तसेच शेतीला पूरक व्यवसाय असावेत म्हणून अण्णांनी दुधसंघ सुद्धा सुरू केला आहे. त्यामाध्यमातून दुधावर प्रक्रिया केलेले पदार्थ तर मिळतातच पण त्याचबरोबर शेकडो युवकांना रोजगार ही मिळतात.शेतीमाल टिकावा म्हणून क्रांती कोल्ड स्टोरेज ची ही निर्मिती अरुण अण्णांनी सहकारी तत्वावर केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत म्हणून पतसंस्थाचीही निर्मिती अरुण अण्णा लाड यांनी केली आहे.असा हा सर्वांच्या सहकार्याने सहकार उभा करणारा लोकनेता आहे. खाजगीकरणातून फक्त मालक पुढे जातो. तर सहकारातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होतो हे तत्व जाणून समाजाच्या हितासाठी झटणारा लोकनेता म्हणजे अरुण अण्णा लाड. तर असे हे अरुण अण्णा पुणे पदवीधर मतदारसंघ २०२० च्या निवडणुकीत उभे आहेत. जर आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा सहकार टिकवून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर अरुण गणपती लाड यांना प्रथम क्रमांकाची पसंती देऊन निवडून देणे आपले कर्तव्य आहे. चला तर म सर्वांच्या सहकार्याने सहकार बळकट करूया ,आपल्या अरुण अण्णांना निवडून आणूया

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top