आज आ.अरुण अण्णा लाड यांनी शिवाजी हायस्कूल चिंचणी येथील चालू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. पहाणी करून योग्य त्या सुधारणा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी कोविड चिंचणी सेंटरला पी.पी.ई किटचे वाटप करण्यात आले. तसेच तडसर येथील कोव्हिड सेंटरला भेट देऊन रुग्णांनी संवाद साधला व डॉक्टर्सकडून आढावा घेतला. बेडची कमतरता जाणवत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ स्वीय रक्कमेने १० बेड उपलब्ध करून देऊ असे आश्वासीत केले.
यावेळी कडेगावं तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष जयदिप यादव, तडसरचे लोकनियुक्त सरपंच हणमंतराव पवार, क्रांती साखरचे संचालक नारायण पाटील, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा वैशालीताई मोहिते, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश शिंगटे, पृथ्वीराज कदम तसेच उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते..