शिर्डी याठिकाणी चालू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाची सुरुवात झेंडावंदनाने करण्यात आली. याप्रसंगी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ हा अधिवेशनाचा मुख्य विषय असून राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे किती सक्षम व परिपूर्ण आहेत ? शिवाय पक्ष बळकटीकरणासाठी करावयाच्या विविध उपाययोजना, पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवावा यासाठी राबवण्याचे विविध कार्यक्रम या बाबी आधिवेशनादरम्यान चर्चिल्या जाणार आहेत. सामान्य माणसाचे हित हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रीद आहे व ते त्याच तत्परतेने जोपासण्याचा सदैव प्रयत्न राहील.