वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट कडून देण्यात येणारा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार आणि कै. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार यावर्षी आपल्या क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.
यावेळी बोलताना मा. अरुण (आण्णा) लाड यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष मा. Sharad Pawar साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मा. ना. Dilip Walse Patil यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आज ऊर भरून आला. स्व. बापूंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंच आहे पण त्यासोबतच आपला कारखाना यशाच्या वाटा पादाक्रांत करत आहे. हे सर्व शक्य आहे इथं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळे मी कारखान्याचा चेअरमन नात्याने कारखान्याचे सर्व संचालक ,एमडी, अधिकारी,कर्मचारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. असे मत व्यक्त केले..