रेल्वे सुरक्षा बल ठाणे, मिरज अंतर्गत किर्लोस्करवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. रेल्वे सुरक्षा बल ही रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी बांधील असणारी एक सर्वोच्च संस्था आहे. किर्लोस्करवाडी येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या नवी चौकीमुळे पोलिसांना याचा भरपूर फायदा होणार असून येथील स्थानिक गुन्हेगारांच्या कारवायांना चाप बसणार आहे. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, किर्लोस्कर कंपनीचे पदाधिकारी, प्रवाशी संघटनांचे पदाधिकारी, रामानंदनगर शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.