राष्ट्रवादी कामगार सेल पलूस यांच्याकडून आज बांधकाम कामगारांना साहित्याच्या पेट्यांच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त उपस्थित राहून बांधकाम कामगारांना पेट्यांचे वाटप करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी कामगार सेलने असंघटीत कामगारांसाठी नेहमीच तत्पर राहून कार्य केले आहे याचा नक्कीच आनंद होतोय. बांधकाम कामगार हा राष्ट्राच्या उभारणीतला महत्वाचा पण असंघटित आणि दुर्लक्षित घटक. आज त्यांना भेटून आनंद झाला. तसेच यापुढेही राष्ट्रवादी कामगार सेलच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी कार्य करत राहणार आहोत याची उपस्थितांना ग्वाही दिली.