विजापूर-गुहागर या महामार्गाचे काम सुरु असून मा. अरुण (आण्णा) लाड यांनी महामार्गावरील घोगाव ते पलूस दरम्यान सुरु असलेल्या कामाची पहाणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी, महामार्गाच्या वाढलेल्या उंचीमुळे रस्त्याकडेच्या शेतकऱ्यांसह मोठे उद्योगधंदे असलेल्या व्यवसायिकांना व दुकानदारांना त्रास होणार आहे. कारण महामार्गाची उंची वाढल्यास पावसाळ्यात सर्व पाणी लगतच्या शेतीमध्ये व व्यावसायिकांच्या कारखाने व दुकानांमध्ये जाईल. शिवाय मालाची ने-आण करताना खूप त्रास सहन करावा लागणार आहे अशी भूमिका मांडली.
यावेळी मा. अरुण (आण्णा) लाड यांनी भविष्यातील हा धोका वेळीच मार्गी लागणे आवश्यक असल्याने याबाबत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढणेसंदर्भात सुचना दिल्या.