कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयलर प्रदीपन करण्यात आले.
क्रांती कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक ऊस विकास योजना आखल्या यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावला आहे. यावर्षीही चांगले पर्जन्यमान झाले असून ऊसाचे उत्पादनही चांगले झाले आहे. यंदा कारखान्याकडे 14 हजार हेक्टर ऊस नोंद आहे, यावरून 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ आहे यातील जास्तीत जास्त कच्ची साखर तयार करणार आहोत. कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढवून 90 हजार लिटर प्रति दिन क्षमतेने चालवणार आहोत. देशातील साखर उत्पादन जास्त झाल्याने त्यातील जवळपास 20 टक्के साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाणार आहे.
तसेच शेतकऱ्यांनी अभ्यासू शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ साधता येईल. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान ऊस उत्पादकांनी आत्मसात करून हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. कारखान्याने हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहेच त्याचा जास्तीतजास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.