भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संस्कृती आणि भारताचं असामान्य कर्तृत्व यांचं स्मरण करत संपूर्ण भारतामध्ये विविध उपक्रम राबविले गेले. या सर्व उपक्रमात अभिमानाने सर्वांनी सहभाग घेतला. नुकताच येडेनिपाणी येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे उद्घाटन व अनावरण समारंभ संपन्न झाला. स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी केलेला त्याग अमूल्य आहे. त्यांच्या या कार्याला अभिवादन करत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान यावेळी करण्यात आला.