पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अरुण (आण्णा) लाड यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या संकल्पनेतून गावचा विकास आणि सामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागराळे येथे गावातील विधवा महिलांच्या हस्ते नारळ फोडून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी त्यांनी नागराळे गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, गावची समृद्धी, विकास आणि एकोप्याचा वसा हाच उद्देश ठेवून एकजुटीने कार्य करू अशी ग्वाही दिली.. विधवा महिलांच्या हस्ते शुभकार्य करू नये या धार्मिक अंधश्रद्धेला दूर करत सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्याचा प्रयत्नही यानिमित्ताने करण्यात आला..
याप्रसंगी सरपंच, पदाधिकारी, नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.