नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव दरम्यान शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या चॉकअप झालेल्या निचरा कॅनॉलला क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून आज सिमेंटच्या पाईप उपलब्ध करून दिल्या.
नागठाणे येथील काळी भाग ते सुर्यगांव असा शेतीसाठी उपयोगी निचरा कॅनॉल आहे. मात्र अलिकडे तो कॅनॉल बऱ्याच ठिकाणी चॉकअप झाल्याने त्यातून पाणी जाणे बंद झाले होते. मात्र या थांबलेल्या पाण्यामुळे तेथील लगतच्या शेतीचं नुकसान होत होते. ही गोष्ट नागठाणे ग्रामस्थांनी दाखवून दिल्यावर त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण झाले. निचरा कॅनॉलला आता मोठ्या सिमेंटच्या पाईप बसवल्यावर शेतीचे नुकसान होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे. त्याबद्दल त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.