दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगावचे ज्योती कॉलेज, बेळगाव येथे स्व. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानास मा.अरुण लाड उपस्थित राहिले. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या क्रांतिकारी कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. कृष्णा मेनसे व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.