डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज याठिकाणी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्र उत्साहात पार पडले.
भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतर सहकार चळवळीत क्रांतिकारी कार्य करणारे काही मोजकीच लोकं होऊन गेली त्यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. यंदाचे वर्ष हे बापूंचे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त मिरज येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नव्याने उजाळा दिला.