क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ, कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक लोकार्पण सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते व अनेक सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्याचबरोबर अन्य कार्यक्रमांचे शुभारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सेनानींनी सक्रिय भाग घेतला आणि परकीय सत्तेचा निकराने मुकाबला केला अशा थोर लढवय्यांपैकी एक म्हणजे क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड. ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि स्वातंत्र्योत्तर काळात समतावादी समाज निर्मितीसाठी अविश्रांत प्रयत्न केले. ग्रामीण भागात कार्यकर्ता म्हणून काम करताना बापूंनी अफाट लोकसंग्रह केला. कृषी व सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी अतुलनीय कार्य केले. सामान्य माणसाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कधीही ढळणार नाही. याची काळजी बापूंनी सदैव वाहिली. आज त्यांची कर्मभूमी कुंडल येथे त्यांचा स्मारक लोकार्पण सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते पार पडला ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या हिमालयाच्या उंचीच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरवही.
यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब, खा. मा. संजयकाका पाटील, खा. मा. श्रीनिवासजी पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. मा. विश्वजित कदम, आ. मा. बाळासाहेब पाटील, आ. मा. मानसिंगराव नाईक, आ. मा. बबनदादा शिंदे, आ. मा. सुमनताई पाटील, आ. मा. विक्रमदादा सावंत, आ. मा. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आणि सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी व अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.