क्रांती अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. पलुसच्या ६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित राहून सर्व संचालक सभासद व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा करीत मार्गदर्शन केले.
सहकारातून समृद्धी हा विकासात्मक दृष्टीकोन वास्तवात उतरवत क्रांती सोसायटी काम करीत आहे. आज तसं पहायला गेलं तर सहकार समृद्ध करणेबरोबरच मुळात तो टिकवता येणे गरजेचे होऊन बसले आहे. योग्य नियोजन व आश्वासक पावले उचलून शेतकऱ्यांच्या हिताचे दृष्टीने आवश्यक ते तत्परतेने करणे हेच आदर्श सहकाराचे मुख्य ध्येय असले पाहिजे. त्यामुळेच या कसोटीवर क्रांती सोसायटी १०० टक्के खरी उतरते.
अल्पावधीत नावारूपास आलेल्या या सोसायटीचा सहकाराचा आलेख असाच वाढत जावा अशी इच्छा याप्रसंगी व्यक्त केली. याप्रसंगी सोसायटीचे संस्थापक मा. शरद लाड, चेअरमन, सर्व सभासद,संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.