क्रांति साखर कारखान्याची २६वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची २६वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

राज्यात एफआरपी पेक्षा जास्त दर देणारा कारखाना म्हणून क्रांती कारखान्याने आपली ओळख नेहमीच जपली आहे. यावर्षीही एफआरपी पेक्षा ८० रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत यातील ४० रुपये भाग विकास निधी व उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावली पूर्व जमा करत आहोत अशी माहिती उपस्थित सभासद शेतकऱ्यांना दिली.

कारखान्याची 2975 रुपये एफआरपी असताना यावेळी शेतकऱ्यांना 3055 रुपये देत आहोत, आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना जशी हवी तशी एफआरपी दिली आहे, यापूर्वी बहुतांश ऊस उत्पादकांनी तीन हप्त्यात एफआरपीची रक्कम द्यावी असे सांगितले त्यानुसार दिली आहे.

यावेळी शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, बदलते पर्जन्यमान तसेच हवामानामुळे पिकांवर येणारी रोगराई यावर अभ्यासपूर्ण शेतीसंबंधी सभासद शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच शेती आणि शेतक-यावर कितीही संकटे आली तरी क्रांती कारखाना शेतक-यांच्‍या पाठीशी ठामपणे उभा असेल याबाबत सभासद शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

क्रांती कारखान्याने वाटचालीचा २६ वर्षाचा दीर्घ टप्पा पार केला आहे. यामागे सभासद व शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वासच आहे आणि कारखान्यानेही आजवर सभासद शेतकऱ्यांचे हीत जपत त्यांना जास्तीतजास्त ऊसदर देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उसतोडीचा हंगाम जवळ येत असल्याने कारखान्याच्या आगामी वाटचालीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाचे उत्पादनही चांगले आहे त्यामुळे यावेळी जास्तीतजास्त उसाचे गाळप करण्याचा संकल्प सर्वानुमते करण्यात आला.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top