क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या वतीने एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुरस्काराचे वितरण केले.
यावेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांशी आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. क्रांती कारखान्याने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. कारखान्याच्या या प्रयत्नास शेतकऱ्यांनीही प्रतिसाद द्यावा असे आवाहन उपस्थित शेतकरी बांधवांना केले..
क्रांती कारखाना शेतक-यांच्या बांधावर जावून शेतक-यांना मार्गदर्शन आणि ऊस विकास सुविधा पुरवित आहे त्यामूळे शेतक-यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेणेची कला आत्मसात करता आली आहे. शेतीचे अर्थकारण आणि ऊस पिक शरीरशास्त्र लक्षात घेवून शेती केल्याने शेतक-याचे एकरी उत्पादन वाढून आर्थीक सुबत्ता आली आहे. कारखान्याच्या माध्यमातून उपसा सिंचन योजनेतून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.