आजकालच्या मुलांमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर खूपच वाढलेला दिसून येतो. मैदानी खेळांकडे सर्रास दुर्लक्ष झालेलं दिसतं. हि बाब जरी दुर्दैवी असली तरी आपला पारंपारिक खेळप्रकार जपण्याचं कामसुद्धा काही क्रीडापटू करत असतात, याचं खरंच कौतुक वाटतं. कारण शारीरिक विकासाबरोबरच बौद्धिक विकासाच्या दृष्टीने सुद्धा मैदानी खेळांचं महत्व अनन्यसाधारण आहे. याच मैदानी खेळातील ‘कुस्ती’ हा एक पारंपारिक आणि अत्यंत लोकप्रिय असा क्रीडाप्रकार आहे. कुस्तीमध्ये अनेक यशस्वी खेळाडू होऊन गेलेले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, कारखाना कार्यस्थळ, कुंडल येथे ‘शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२३’ संपन्न झाली. या स्पर्धेचं उद्घाटन करत अगदी उत्साहात स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धक, त्यांचे प्रशिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.