क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी महोत्सव व भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्त आयोजित संविधानिक विचारांचा जागर आणि भारतीय लोकशाही याविषयी आयोजित भव्य विराट मेळावा माझ्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमराई ते शांतिनिकेतन लोकविद्यापीठ पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
या विराट मेळाव्या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत, महात्मा गांधींचे पणतू मा. तुषारजी गांधी, चित्रलेखा साप्ताहिक मुंबईचे संपादक मा.ज्ञानेश महाराव व जेष्ठ विचारवंत मा.बाबुरावजी गुरव यांनी भारतीय संविधानाची मूल्ये टिकविण्यासाठीची कटिबद्धता व स्वातंत्र्यलढ्यातील सातारा प्रतिसरकारचे योगदान व लोकशाहीसमोरची आव्हाने या विषयावर अमुल्य मार्गदर्शन केले.
लाखो देशभक्तांनी आपले रक्त सांडून त्याग आणि बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळविले आहे. पण सध्याच्या काळात केंद्रीय सत्तेकडून आणि त्यांच्या सहयोगी संघटनांकडून वारंवार लोकशाही मुल्यांची पायमल्ली केली जात आहे याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. सदर कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला.