क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त २ सप्टेंबर रोजी सांगली येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे विराट मेळावा होत आहे, त्यानिमित्त नियोजनात्मक बैठक आज क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सांगली जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारकांनी परकीय ब्रिटिश सत्तेचा निखराने मुकाबला केला. प्रसंगी तुरुंगवास पत्करला अशा थोर लढवय्यांपैकी तुफान सेनेचे महत्वाचे शिलेदार, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड एक होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील प्रतिसरकार चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान, तसेच संविधान व लोकशाही समोरील आव्हाने या विचारांचा जागर करण्यासाठी जेष्ठ विचारवंत तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू मा. तुषारजी गांधी व चित्रलेखा साप्ताहीकाचे संपादक मा. ज्ञानेश महाराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विराट मेळावा संपन्न होणार आहे. तरी स्वातंत्र्य लढ्यातील प्रतिसरकार चळवळीतील क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण या विराट मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार अरुण लाड यांनी केले