“आज प्रत्येकाने दिवसातून १०- २० मिनीटे सायकल चालवली पाहीजे, हे एक प्रकारचे निरोगी राहण्यासाठी औषधच आहे. बापूंना खेळ आवडायचे, लहान मुलं बापूंना प्रिय होती. आज बापूंची जन्मशताब्दी वर्ष साजरं होतं असताना या सयक्लोथॉन स्पर्धांमध्ये लहान मुलांचा उत्साह विशेष होता. ही लहान मुलं मोबाईल, टीव्ही समोर अडकुन न पडता मैदानात वेळ घालवावा, बौध्दीक आणि शारिरीक विकास होईल ही अपेक्षा ठेऊयात. आशा स्पर्धांमधुन बापुंच जीवन या मुलांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करुयात”
क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त “सायक्लोथॉन२०२२” स्पर्धा अभुतपूर्व उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातून तब्बल ९५० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
आयर्न मॅन डॉ.ऍड. गणेश चौगुले, अंतरराष्ट्रीय कबड्डी पट्टू महेश भिलवडे, हॅण्डबॉल खेळाडू प्रणव भागवत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवरंजनी पाटील यांचेसह परिसरातील खेळाडू उपस्थित होते.
मिरजेतील अशोक पाटील या ७५ वर्षीय आणि भिलवडी स्टेशन येथील ८५ वर्षीय भीमराव सूर्यवंशी या दोघांनी ४२ किलोमीटर सायकल चालवून स्पर्धकांत उत्साह निर्माण केला म्हणून त्यांचा विशेष सत्कार केला.