पुण्यातील सदाशिव पेठ येथे क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित क्रांतिअग्रणी अभ्यासिकेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले. ताईंनी याप्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.
पुणे हे शिक्षणाचे “हब” होत आहे कारण येथे सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. आयुष्यात स्पर्धा असणे गरजेचे आहे पण ती योग्य हवी. स्पर्धापरिक्षेसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यासाठी अशा अभ्यासिकेतून ते मिळने गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलांच्यात जिद्द आहे पण आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांना अशा किफायतशीर, सुसज्य अभ्यासिका उपयोगी पडतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पदवीधर निवडणुकीत शब्द दिला होता त्यानुसार परवडेल अशा आणि सर्व सोईनियुक्त अभ्यासिकेची सुरुवात करताना आनंद होत आहे. यादृष्टीने यापुढेही अनेक कामे करायची आहेत. स्पर्धा परिक्षात नवी पिढी सक्षमपणे उतरावी, ग्रामीण भागात त्याचे शिक्षण मिळावे म्हणून कुंडल (ता पलूस) येथे निशुक्ल अभ्यासिका सुरू केली आहे. विद्येच्या माहेर घरात जागेचा अभाव लक्षात घेता “क्रांतिअग्रणी अभ्यासिका” सुरु केली असून याचा विद्यार्थी मित्रांना नक्कीच लाभ होईल.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ग्रामीण अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सांगली जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड, काकासाहेब चव्हाण यांचेसह शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.