कोल्हापूरमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सभा पार पडली. सभेमध्ये साहेबांनी शेतकरी, तरुण, महिला यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारच्या हातून सत्ता काढून घेण्याचा निर्धार करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. पुरोगामी विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्व नागरिकांचा प्रचंड उत्साह या सभेवेळी दिसून येत होता. सभेमध्ये झालेल्या चर्चेद्वारे आणि साहेबांच्या मार्गदर्शनातून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी एक नवी आणि योग्य दिशा नक्कीच लाभेल यात शंका नाही.