oxygen-concentrator

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला मदतीचा हात ! पदवीधर आमदार मा. अरुण अण्णा लाड यांच्याकडून १५ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांच्या दृष्टीने अजून भक्कम व्हावी यासाठी आज १५ ऑक्सीजन कॉन्स्नट्रेटर सोलापूरचे मा. जिल्हाधिकारी मिलींद शांभरकर यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण चालू झाले, तरीही प्रत्येकाने जबाबदारीने लसीकरण करून घ्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वागणे ही आपली जबाबदारी आहे. इथून पुढेही शक्य ती मदत करण्यासाठीचे आश्वासन मा. जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. मिलींद शांभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्री. भारत वाघमारे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, काँग्रेस महापालिका गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे नेते पद्माकर नाना काळे, नगरसेवक तौफिक शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top