कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था वैद्यकीय सोयी सुविधांनी दृष्टीने अजून भक्कम होत रहावी यासाठी आज ३ व्हेंटिलेटर मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरीही आपण अजून सावधगिरीने वागले पाहिजे. राज्यातील टाळेबंदी उठवली आहे पण अत्यावश्यक काम असणाऱ्यानीच स्वत:ची काळजी घेऊन बाहेर पडा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वागणे ही आपली जबाबदारी आहे. इथून पुढेही शक्य ती मदत करण्यासाठीचे आश्वासन मा. जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले. यावेळी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अभिजीत चौधरी, मा. प्रतीक जयंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. शरद भाऊ लाड, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे, उपस्थित होते.