सांगलीतील लोकमान्य सोसायटी यांच्यावतीने कच्छी जैन भवन सांगली येथे स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वतंत्र सेनानींचे चित्रगाथा प्रदर्शनाचे उदघाटन मा. अरुण (अण्णा) लाड यांनी केले.
सांगली ही क्रांतिकारकांची भूमी. या मातीतील अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. प्रसंगी तुरुंगवास, देहदंड सोसला, रक्त सांडले. त्यांच्या अलौकिक त्यागाचे स्मरण, गौरव करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला देशभक्ती आणि त्यागाची प्रेरणा मिळते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लोकमान्य सोसायटी यांच्यावतीने आयोजित स्वातंत्र्यसेनानींचे चित्रगाथा प्रदर्शन नक्कीच कौतुकास्पद आहे. यातून स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास, त्यांच्या कार्याला नव्याने उजाळा मिळेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी समवेत लोकमान्य सोसायटीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..