आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान केला.
शिक्षक फक्त मुलांना, युवकांना शिकवत नाही तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतो. देशाचा लौकिक शिक्षकांच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना शैक्षणिक चळवळींची मोठी परंपरा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथील सर्वसामान्यांची मुलेही शिकून प्रशासनाच्या मूळ प्रवाहात यावीत यासाठी सक्तीचे मोफत शिक्षण गावोगावी सुरु केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत क्रांती घडवून आणली. वेळोवेळी यात प्रगती होत जाऊन आज अत्याधुनिक महाविद्यालये उभी राहिली आहेत. हा प्रवास नक्कीच गौरवास्पद आहे. या सर्वांमध्ये शिक्षकांचे कष्ट व त्यांचे विध्यार्थी घडवण्यामध्ये असलेले योगदानही तितकेच महत्वाचे आहे. आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांनी गुणवंत शिक्षक पुरस्कार ही शिक्षकांच्या सन्मानासाठी राबविलेली एक चांगली संकल्पना आहे. त्यांचे या अभिनव उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन. व भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.