सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे चालूच आहे. मागच्या १० दिवसांपूर्वी तडसर गावाच्या कोविड सेंटरला आ. अरूण अण्णा लाड यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांना कोविड सेंटरला बेड्सची कमतरता असल्याचे निदर्शनास आले होते. आपल्या स्वीय रकमेतून बेड्स उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेल्या आ. अरूण अण्णा लाड यांच्या वतीने आज तडसरच्या कोविड सेंटरला १० बेड्स उपलब्ध करून दिले.
सध्या कोरोना संदर्भात कुठलीही अडचण असू द्या आम्ही दिलेल्या हेल्पलाइन नंबरचा उपयोग करा. तसेच तरुण वर्गाने पुढाकाराने गावात कोणतीही समस्या उद्भवली तर लगेच संपर्क करा. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा. तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये कुणाचे नातेवाईक कोरोना रूग्ण असतील शासनाने ठरवून दिलेल्या कोविड उपचारांचा दर बघा. कोरोना आपल्या गावात येणार नाही यासाठी प्रत्येकाने सतर्क रहा. अशा सुचना गावकऱ्यांना दिल्या.