केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व शुगर एक्स्पो मध्ये शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल देशपातळीवरील “जीवन गौरव पुरस्कार” भारत सरकारचे अन्न व सुरक्षा विभागाचे केंद्रीय सचिव मा. श्री. संजीव चोप्रा यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारत यावेळी आभार व्यक्त केले.
क्रांती कारखान्याने सुरुवातीला केवळ अडीच हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेने सुरुवात करून आजरोजी अगदी कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त केला आहे. ऊस क्षेत्र वाढून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे म्हणून निरनिराळ्या ऊस विकास योजना तत्परतेने आखल्या आणि बेभान होऊन राबविल्या. या योजनांतून शेतकऱ्याच्या आणि त्या अनुषंगाने कारखान्याच्या विकासात भरीव वाढ झाली. त्यामुळे केलेले प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना मनात घेऊन हा पुरस्कार स्वीकारताना झालेला आनंद आणि समाधान शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे आहे.