आनंदसागर पब्लिक स्कुल & ज्युनियर कॉलेज, तासगाव यांच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दीनिमित्त आयोजित भव्य शोभा रथयात्रा, बक्षीस वितरण समारंभ व जाहीर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी योगदान दिले, प्रसंगी देहदंड सोसला यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. तुफान सेनेचे फिल्डमार्शल व स्वातंत्र्यानंतर शेतकरी, कष्टकरी जनतेच्या उद्धारासाठी वाहून घेत सहकाराला गती देण्याचे कार्य त्यांनी केले. यंदाचे वर्ष हे बापूंचे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त तासगाव येथील आनंदसागर पब्लिक स्कुल & ज्युनियर कॉलेजतर्फे क्रांतिअग्रणी बापूंच्या गौरवशाली कार्याला उजाळा देण्यासाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.