आज सांगली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, या सांगली जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसोबत ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहिलो.
“क्रिडा हा विषय अत्यंत महत्वाचा असुन याला असाधारण महत्त्व आहे. आज लॉकडाऊन मुळे मैदानी खेळ बंद आहेत. याचा फटका मुलांना बसत आहे. खेळामुळे मुलं सुदृढ आणि निरोगी राहतात. पण खेळ नसेल तर मुलांची इम्युनिटी कमी होण्याच्या अडचणीत येत आहे. क्रिडा विभागाचे प्रश्न शासन स्तरावर पाठपुरावा करुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असून याला संघटनांचे पाठबळ सुध्दा अपेक्षित आहे.” असे मत यावेळी मांडले.
तसेच पलुस तालुक्यासह इतर तालुक्यातील क्रिडा संकुलाचे कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिल्या!