आमदार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ
सदस्य, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य
अरुण लाड यांच्या बद्दल थोडक्यात परिचय
अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.
सामाजिक कार्ये
काल कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मा. सुप्रियाताई सुळे
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ, कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक लोकार्पण सोहळा
पुण्यातील सदाशिव पेठ येथे क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित क्रांतिअग्रणी अभ्यासिकेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले. ताईंनी
आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पलुस तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी चारा पाठवण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. दिनकरजी
समाज माध्यमांवर आमच्याशी जोडले जा.
नवीन बातम्या
क्रांती चषक बांबवडे 2023 या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करीत खेळाडूंना सदिच्छा दिल्या. सध्या भारतात सुरु असणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे सगळीकडेच क्रिकेटचा फिवर जरा जास्तच जाणवतोय.
आजकालच्या मुलांमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर खूपच वाढलेला दिसून येतो. मैदानी खेळांकडे सर्रास दुर्लक्ष झालेलं दिसतं. हि बाब जरी दुर्दैवी असली तरी आपला पारंपारिक खेळप्रकार जपण्याचं
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकाबरोबरच द्राक्ष पिकाचे क्षेत्र भरपूर आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीबरोबर द्राक्ष पिकामधील ऑक्टोबर
केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व शुगर एक्स्पो मध्ये शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल देशपातळीवरील “जीवन गौरव पुरस्कार” भारत सरकारचे